स्त्री शिक्षण, समानता व सत्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शहरातील माळी बोर्डिंग येथे आज २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अभिवादन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास आ.आशुतोष काळे, ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी नगरध्यक्ष व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्माकांतजी कुदळे, बाळासाहेब पांढरे, माजी नगरसेवक विर