शिरपूर: शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याचा गुन्ह्यात फरार संशयीत लालमाती परिसरातून जेरबंद
Shirpur, Dhule | Oct 16, 2025 तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दाखल दरोड्यातील गुन्ह्यात फरार संशयीताला एक गावठी बनावटीच्या पिस्तुल व दुचाकीसह मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गवर तालुक्यातील लालमाती परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आल्याची माहिती 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास प्रसार माध्यमांना दिली आहे.संशयीत तेजस दिपक सनस वय 23 वर्षे रा. सनसनगर गुजर निंबाळकर वाडी कात्रज पुणे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.