चामोर्शी: डॉ . नामदेव उसेन्डी यांनी गडचिरोली बांबू कारखान्यात आयुध पुजा करून कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली विजयादशमी
गडचिरोली: माजी आमदार डॉ. नामदेव उसेन्डी यांनी आज विजयादशमी दसरा निमित्त आपल्या कुटुंबासह गडचिरोली येथील जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित (बांबू टाईल्स व फर्निचर कारखाना) येथे अवजारे आणि मशनरींची विधिवत पूजा केली. कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगारांना सोबत घेऊन त्यांनी हे पूजन केले आणि दसऱ्याच्या पारंपरिक उत्साहात सहभाग घेतला.यावेळी डॉ. उसेन्डी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. या पूजनामुळे कारखान्