विक्रमगड: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा पालघर ग्रामीण रुग्णालय येथे मान्यवरांचे उपस्थितीत शुभारंभ
केंद्र सरकार तर्फे महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात असून या अभियानाच्या शुभारंभ पालघर ग्रामीण रुग्णालय येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. अभियानाच्या निमित्ताने महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, स्तन गर्भाशय मुखाचा कर्करोग, एचआयव्ही, क्षयरोग, सिकलसेल, दंत तपासणी आदी चाचण्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अंगणवाडी स्तरावर आहार पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ, स्थानिक आहाराचा प्रसार, अॅनिमिया जनजागृती, योग व मानसिक आरोग्य उपक्रम घेण्यात येणार आहेत.