धुळे: देवपूर स्वामीनारायण मंदिरात शारदा पूजन उत्साहात, ५०० हून अधिक चोपड्यांचे पूजन
Dhule, Dhule | Oct 20, 2025 धुळे येथील स्वामीनारायण मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शारदा पूजनाचा पारंपरिक सोहळा श्रद्धा व उत्साहात पार पडला. पूज्य आनंदजीवन स्वामी यांच्या हस्ते व्यापाऱ्यांनी सुमारे ५०० हिशेबाच्या वह्यांचे पूजन केले. वैदिक मंत्रोच्चार व भजनांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. व्यापारी व हरीभक्तांनी एकत्र येत नववर्षात यश, समाधान आणि समृद्धी लाभावी, अशी श्री स्वामीनारायण भगवान व लक्ष्मीमातेकडे प्रार्थना केली.