शिरपूर: शिरपूर फाट्यावर एकाच रात्री सलग 5 ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Shirpur, Dhule | Nov 8, 2025 शिरपूर शहरातीलआमोदे शिवारातील शिरपूर फाट्यावर निळकंठेश्वर महादेव मंदिर आणि महामार्ग परिसरात 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सलग पाच ठिकाणी चोरी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.एका रात्रीत चार शोरूम आणि एका घरात घरफोडी झाल्याने व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली.मिळालेल्या माहितीनुसार, खानदेश ट्रॅक्टर शोरूम,आकाश सुझुकी शोरूम, विमलनाथ शोरूम,विशाल टायर्स अँड मशनरी तसेच वजन काटा लगतच्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे.