गोंदिया: आसोली येथे अवैध दारू जप्त,ग्रामीण पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल
ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम आसोली येथे शैलेश खूपचंद गजभिये (५०, रा. आसोली) याच्या जवळून देशी दारूच्या १५ बाटल्या पोलिसांनी धाड टाकून जप्त केल्या. ही कारवाई बुधवारी (दि. ५) सायंकाळी ४ वाजता करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास हवालदार मरस्कोल्हे करीत आहेत.