पारनेर: बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, ग्रामस्थांकडून कल्याण हायवेवर तासभर रास्ता रोको, ग्रामस्थ संतप्त...!
आहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष आता चिंतेचा विष्य झाला आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वनविभागाला या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश नागरिकांच्या संतापाला कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे. अश्यातच २ डिसेंबर रोजी पारनेर तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध भागुबाई खोदडे यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे किन्हीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, या