गोंदिया: हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला मोठा हादरा 11 जहाल नक्षलवाद्यांचे मुदतीपूर्वीच गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी दिलेली एक जानेवारी 2026 ही मुदत धुडकावून समितीचा प्रवक्ता अनंत यांच्यासह दरेकसा दलममधील 11 जहाल नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान गोंदिया पोलिसांसमोर अचानक आत्मसमर्पण केले या महत्त्वपूर्ण घटनेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला असून ही संघटना पूर्णपणे कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे आत्मसमर्पणाच्या वाटाघाटीत माओवाद्यांच्या सतत बदलणाऱ्