पोलादपूर: पोलादपूर एसटी स्टँडच्या दुर्गंधी विरोधात सामाजिक संस्थेचं अनोखं "भिक मागो" आंदोलन!.@raigadnews24
पोलादपूर एसटी स्टँड परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या समस्येने नागरिकांचे नाक मुरडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. महिला व पुरुष स्वच्छतागृहाची अवस्था देखील अत्यंत दयनीय असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. एसटी महामंडळ आणि नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करूनही काहीच सुधारणा न झाल्याने “आपली माती आपली माणसं” सामाजिक संस्थेने अखेर अनोखे भीक मागो आंदोलन छेडले.