चंद्रपूर: सेनगाव येथील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश
शहरासोबतच आता ग्रामीण भागातही विकासकामांना गती मिळाली आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतीसाठी ठोस धोरणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक, महिला आणि समाजातील गरीब घटकांना न्याय मिळवून देणे तसेच सर्वांगीण विकास करणे हाच भाजपा सरकारचा दृढ संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.