शहराचे मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या फुटाळा तलाव परिसरात आज एक मालवाहू वाहन उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ सांडल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.मिळालेल्या माहितीनुसार, बर्फाच्या पेट्या घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन फुटाळा तलावाजवळील रस्त्यावरून जात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने उलटले.