संगमनेर: सुतारोडा वस्तीवर बिबट्याचा भीषण हल्ला; अनिता वाघचौरे गंभीर जखमी
सुतारोडा वस्तीवर बिबट्याचा भीषण हल्ला; अनिता वाघचौरे गंभीर जखमी अहिल्यानगर – आज (१७ सप्टेंबर) सकाळी सुमारे ११ वाजता राहील वस्ती सुतारोडा येथे बिबट्याने भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात अनिता वाघचौरे या महिलेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिता वाघचौरे या आपल्या पतीसोबत शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठीमागून हल्ला केला.