आज शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सावनेर येथे प्रस्तावित ट्रामा केअर सेंटर संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत ट्रामा केअर सेंटरच्या बांधकामाच्या प्रगतीबाबत तसेच पदभरती प्रक्रिये संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. सावनेर परिसरातील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक तत्काळ, सक्षम व दर्जेदार स्वरूपात उपलब्ध व्हावी, या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.