बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथून प्रस्थान ठेवून श्रीक्षेत्र शिर्डीकडे निघालेल्या साई पालखीचे राहुरी फॅक्टरी येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. चेतक युवा प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या १७ वर्षांपासून या पालखीचे स्वागत केले जात असून यंदाही छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.यानंतर साईबाबांची आरती तसेच आमटी-भाकरी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.