पनवेल: कोपरखैरणे येथे उभी केलेली बाईक चोरीला, कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 4, 2024 कोपरखैरणे सेक्टर ४ येथून अभिजीत पांचाळ या तरुणाची मोटारसायकल चोरीला गेली आहे. जीमच्या बाहेर रस्त्यालगत ही मोटारसायकल उभी केली होती. तो काही कामानिमित्त जिममध्ये गेला, परत आल्यावर त्याला त्याची बाईक आढळून आली नाहीं आपली बाईक चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.