मानसिक ताण-तणाव वाढत असल्यास त्वरित मदत घ्या 'टेलिमानस' हेल्पलाइन १४४१६ नागरिकांसाठी उपलब्ध आजच्या धावपळीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित मदत घेतल्यास नैराश्य, भीती, ताण-तणाव यांसारख्या स्थितीवर योग्य वेळी नियंत्रण मिळवणे शक्य होते. मानसिक आरोग्य हा व्यक्तीच्या एकूण आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.याकरिता 14416 ह्या हेल्पलाइन वरून मोफत सेवा उपलब्ध आहे.