महाड: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑनलाइन माध्यमातून रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले
Mahad, Raigad | Sep 15, 2025 सुधारित महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणी बाबत धोरणात्मक बाबींवर निर्णय घेणाऱ्या राज्य आरोग्य हमी सोसायटी नियामक परिषदेची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभागी होत योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले.