यशदा, पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्र राज्य नागरी सेवा संवर्गातील १६ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्याला चार दिवसांची भेट दिली. या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी द्राक्ष शेतीतील अडचणी, सह्याद्री फार्म्समधील आधुनिक शेती पद्धती, लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव प्रक्रिया तसेच HAL येथे सुखोई विमान निर्मितीचा अभ्यास केला. याशिवाय शहर पोलीस आयुक्तालयात कुंभमेळा