न्यू युवा स्टार मंडई उत्सव मेळावा समिती हमालापुरीच्या वतीने पं.स. रामटेकचे माजी सभापती नरेंद्र बंदाटे यांच्या मुख्य संयोजनाखाली मकर संक्रांतीनिमित्त दि. 15 जानेवारी ते रविवार दि. 18 जानेवारी पर्यंत भव्य मंडळी उत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शनिवार दि. 17 जानेवारीला विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर विविध कार्यक्रमानंतर रात्री 8 वाजता पासून गुरुदेव नाट्यकला मंडळ चिचाळा द्वारे 9अंकी नाटक अपना किसे कहे प्रस्तुत करण्यात आले.