जालना: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जालन्यात पाठिंबा; 31 ऑक्टोबरला अंबड चौफुलीवर शेतकर्यांचा रास्ता रोको आंदोलन
Jalna, Jalna | Oct 30, 2025 शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर येथे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या जनआंदोलनाला जालना जिल्ह्यातील शेतकर्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. गुरुवार दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय. त्यांच्या समर्थनार्थ जालना जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि शेतकर्यांच्या वतीने येत दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी अंबड चौफुली येथे संविधानिक मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.