पवनी: पवनीकरांनी ऑनलाईन खरेदी टाळून स्थानिक बाजारपेठेला द्यावी साथ : भाजपचे जिल्हा सचिव डॉ. विजया ठाकरे नंदुरकर video #viral
Pauni, Bhandara | Oct 17, 2025 पवनी हे ऐतिहासिक शहर असले तरी कोविडनंतर येथील स्थानिक व्यापार घटताना दिसून येत असल्याची खंत व्यक्त करत भाजपचे जिल्हा सचिव डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी पवनीकरांना एक विशेष आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करा. ऑनलाईन खरेदी टाळा आणि आपल्या खरेदीतून शहरातील छोटे-मोठे व्यापाऱ्यांच्या घरातही आनंदाची दिवाळी उजळू द्या.”