देवळी: पुलगाव बस स्थानकात 3 नव्या लालपरी बसेसचे लोकार्पण;आ.बकाने यांच्या हस्ते उद्घाटन:ग्रामीण विद्यार्थी शेतकरीचा सुखकर प्रवास
Deoli, Wardha | Oct 21, 2025 पुलगाव बस स्थानकात आज तीन नव्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे लोकार्पण झाले आहे. स्थानिक आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते आज 21 ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हा सोहळा पार पडला.पारंपरिक पद्धतीने बसची पूजा करून आमदार बकाने यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नवीन बसमधून पुलगाव शहराची फेरी मारत औपचारिक उद्घाटन केले.