आज दिनांक 25 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील निमखेडा शिवारातून पूर्णा नदी पात्रात सुरू असलेले अवैद्य वाळू उपसा करणारी जेसीपी व हायवा पोलिसांनी जप्त केले आहे, सदरची कारवाई दिनांक 23 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आले असून ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण यांनी व महसूल विभागाच्या पथकाने केली असून या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा व चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणारे चांगलेच धाबे दणाणले आहे.