नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने नेवासा शहराचे पूर्णपणे ढवळून निघाले असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी मध्यरात्रीनंतर घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या व धक्कादायक निर्णयामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन वादांमुळे बाधित झालेल्या नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे.