निलंगा: हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक व प्रशासकीय कार्यालयात आ. निलंगेकरांनी केले अभिवादन
Nilanga, Latur | Sep 17, 2025 हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज हुतात्मा स्मारक, निलंगा, तहसील कार्यालय, निलंगा, नगरपरिषद कार्यालय, निलंगा, पंचायत समिती, निलंगा, उपविभागीय कार्यालय, निलंगा व छत्रपती शिवाजी महाराज चौक, निलंगा येथे जाऊन हैदराबाद मुक्तीलढ्यातील महान वीरांना आणि महापुरुषांना अभिवादन केले. तसेच हैदराबाद संस्थानाला क्रूर निजामाच्या जाचातून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.