सावनेर: खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत चिंचोली येथील गजानन महाराज मंदिराजवळ सहा बोकडांची चोरी
Savner, Nagpur | Oct 31, 2025 खापरखेडा परिसरात चोरट्यांनी दहशत निर्माण केली नुकत्याच झालेल्या गाईच्या चोरीनंतर आता चिचोली येथील गजानन महाराज मंदिराजवळ सहा बकरांची चोरी झाली ही घटना 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली दादाचंद फटिंग यांच्या घराच्या मागील बाजूस बांधलेल्या गोठ्यात चोरट्याने रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी कुलूप तोडून जवळपास 50 हजार किमतीचे बोकड कारमध्ये कोंबून पळून नेले