हिंगोली: नरसी नामदेव येथे संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पावन जन्मभूमी हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे यंदा ७५५ व्या जन्मतिथी सोहळ्याचा निमित्ताने भव्य दीपोत्सव आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सहा वाजता दरम्यान हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दरम्यान संपूर्ण नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.