कामशेत शहर हद्दीत खामशेत जवळ आज (दि. 11 नोव्हेंबर) सकाळी सव्वा सहाच्या सुमारास उरण ते आळंदी पायी दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला. भरधाव वेगातील कंटेनरने वारकऱ्यांना धडक दिल्याने एका महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. जखमी वारकऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला.