दक्षिण सोलापूर: होटगी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुभाष देशमुख यांनी केली साई मंदिरावर प्रार्थना...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी दुपारी 3 वाजता साई मंदिरात आमदार सुभाष देशमुख यांच्यासह भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले. या पवित्र प्रसंगी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन मोदी यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी मनोभावे प्रार्थना केली. साई मंदिरात भक्तांनी श्रद्धेने आरती अर्पण करत मोदी यांच्या सुखसमृद्ध आयुष्याची कामना केली. या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.