कोर्टाच्या निर्णयानुसार नायलॉन मांजावर बंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरात विक्री सुरू आहे . याची माहिती पर्यावरण बचाव समितीला मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली याबाबत पोलिसांनी दोघांवर आज कार्यवाही केली..55 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.. कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अल्पवयीन मुलास 25000 आणि नायलॉन मांजाची विक्री करताना मिळून आल्यास दोन लाख पन्नास हजार रुपये दंडाचे प्रावधन आहे मात्र नगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याची ओरड आहे..