अर्जुनी मोरगाव: सरस्वती महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे रा से यो स्थापना आठवडा अंतर्गत व्यवसाय मार्गदर्शन व राष्ट्रीय एकात्मतेचा जागर
दिनांक 23 सप्टेंबरला सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी / मोर. येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आठवडा अंतर्गत विद्यार्थी प्रिय शिक्षक सत्कार व विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय मार्गदर्शन विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. पर्यवेक्षक एस. जी राघोर्ते यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उपलब्ध संधीविषयी विविध विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण,पर्यवेक्षक एस.जी.राघोर्ते व विज्ञान विभाग प्रमुख टी. एस. बिसेन प्रामुख्याने उपस्थित होते.