आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन शहरातील नगरपरिषद मंगल कार्यालयामध्ये निवडणूक नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली आहे ही छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली असून यामध्ये 154 उमेदवारांची अर्ज तपासणी करण्यात आली आहे यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अगदी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत ही अर्ज छाननी प्रक्रिया आज पार पडली आहे.