नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर निघालेल्या मिरवणुकीतून अज्ञात चोरट्याने साडेतीन तोळे किमतीची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात भास्कर विश्वनाथ आहेर वय ५३ वर्षे राहणार लाख खंडाळा हल्ली मुक्काम वार्ड क्रमांक पाच सी सेक्टर सिडको एनफोर छत्रपती संभाजी नगर यांनी तक्रार दाखल केली आहे.