भंडारा: शहापूर येथील डिफेन्स अकॅडमी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न ; शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
शहापूर येथील डिफेन्स अकॅडमीच्या सभागृहात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले. हे आयोजन २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुकास्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावून आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावला. यावेळी विविध अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची विशेष उपस्थिती होती.