अक्कलकुवा: मोलगी गावात आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा आणि सभा संपन्न
आदिवासी आरक्षण बचाव धडक मोर्चा आणि एक दिवसीय आंदोलनाचे मोलगी गावात आयोजन करण्यात आले होते. आज दुपारी मुख्य बाजारपेठेतून धडक मोर्चा निघाला आणि या मोर्चाचं अप्पर तहसील कार्यालय परिसरात सभेत रूपांतर झाले. उपस्थित विविध आदिवासी लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी आपले मत सभेच्या माध्यमातून व्यक्त केले.