सेलू: तळोदी येथे वृद्ध आईला मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत मुलाविरुद्ध तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 12, 2025 दारू ढोकसून आलेल्या मुलाने आपल्या 70 वर्षीय आईला मारण्याची धमकी दिली. ही घटना तालुक्यातील तळोदी येथे ता. 12 रविवारी सकाळी 10 वाजताचे सुमारास घडली. याप्रकरणी घाबरलेल्या शांताबाई वसंतराव मसराम वय 70 रा. तळोदी यांनी किशोर वसंतराव मसराम रा. तळोदी याच्याविरुद्ध दुपारी 1.30 वाजता तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.