हिंगोली: वटकळी येथे भाजप युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांच्या हस्ते पांदन रस्त्याचे उद्घाटन संपन्न
हिंगोली विधानसभेतील वटकळी गावात पांदण रस्त्यांच्या विकास कामांचे भूमिपूजन भाजपा युवा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भूमिपूजनानंतर गावकऱ्यांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले आणि आगामी काळात आणखी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली