आदिशक्ती महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायत रेहकी येथे मकरसंक्रांती व नववर्ष स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आज दिनांक १७ जानेवारी, शनिवार रोजी दुपारी २ वाजता श्री संत गोपिका माता देवस्थान प्रांगणात तिळगुळ गोडीने मकरसंक्राती सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, माँ जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.