बारामती: बारामतीत हॉटेल चालकाला खंडणीसाठी बेदम मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
Baramati, Pune | Dec 28, 2025 बारामतीत एका हॉटेल व्यवसायिकावर खंडणीसाठी आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल सुरू ठेवायचे असल्यास दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.