सावर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.
7.9k views | Yavatmal, Maharashtra | Jul 24, 2025 यवतमाळ : सावर तालुका बाभूळगाव येथे छत्रपती संभाजी महाराज समाधान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात जनहितासाठी आयुष्यमान कार्ड व सिकलसेल रुग्ण तपासणीची स्टॉल लावण्यात आले होते. सदर शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संघर्ष राठोड, विस्तार अधिकारी आरोग्य श्री प्रशांत पाटील यांनी शिबिरास भेट देऊन पाहणी केली व योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी सदर शिबिरास आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञान व आशा स्वयंसेविका यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले