दारव्हा: बसस्थानक परिसरातील विक्की कॅफेवर पोलिसांचा छापा; आक्षेपार्ह साहित्य जप्त
दारव्हा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या विक्की कॅफेवर शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांनी धाड टाकून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निखिल कोरपे यांनी केली.