कोरची: कोरचीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आम आदमी पार्टीचे निवेदन, नगर पंचायतला १५ दिवसांचा अल्टिमेटम
आम आदमी पार्टी, गडचिरोलीच्या वतीने कोरची नगर पंचायत क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी दि.१५ सप्टेबंर सोमवार रोजी दूपारी ३ वाजता नगर पंचायत कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. मागील 10 वर्षांपासून योजनेची अंमलबजावणी बंद असल्याने अकुशल मजुरांना रोजगारा करीता शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे त्यामूळे ग्रामीण विकास खूंटत आहे.