भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी खोपोली नगरपरिषद कार्यालयात आपला पदभार स्वीकारला. यावेळी प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि नागरिकांच्या उपस्थितीने नगरपरिषद परिसर गजबजून गेला होता. कुलदीपक शेंडे यांचे नगरपरिषद कार्यालयात आगमन झाल्यानंतर, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.