उमरेड: उमरेड नगरपरिषद निवडणूक ; मतपेट्यांमध्ये उमेदवारांचे 'नशीब'बंद
Umred, Nagpur | Dec 2, 2025 उमरेड नगर परिषदेसाठी आज दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पासून तर दुपारी साडेपाच वाजेपर्यंत मतदातांनी आपला हक्क बजावला. आता उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील झाले आहे. मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून मतमोजणीची तारीख बदलल्याची माहिती पुढे आली आहे.. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सर्व सदस्य पदांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीमुळे मतमोजणीच्या दिवशी उमरेडमध्ये राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.