पालघर नगरपरिषद निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन व सदस्य पदासाठी चार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी प्रशांत प्रभाकर पाटील यांनी भारतीय जनता पक्ष व अपक्ष असे 2 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग 5- ब मधून ऐश्वर्या अवस्थी यांनी मनसे व अपक्ष असे दोन, प्रभाग 15- ब मधून विनोद चव्हाण यांनी अपक्ष व प्रभाग 2- अ मधून मनोहर सोनू दांडेकर यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.