अंबरनाथ: बदलापूर मध्ये मतदारांवर पैशाचा पाऊस, धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
बदलापूर मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार केला जात आहे. कार्यकर्ते सातत्याने आमने-सामने येत आहेत तर मारामारी देखील करत आहेत. हे सर्व व्हिडिओ व्हायरल होत असतानाच एक नवीन धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पक्षांचे कार्यकर्ते चक्क घराघरात जाऊन नागरिकांच्या घराच्या बेल वाजवून त्यांना पैशाचे पाकीट देत असतानाच सीसीटीव्ही समोर आला आहे. हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहे त्याची अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.