महाड: पालकमंत्री पदासाठी देवीला साकडं घालतो : मंत्री भरत गोगावले
Mahad, Raigad | Sep 21, 2025 रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मी देवीला साकडं घालतोय. देवीला वाटत असेल मी तिचा भक्त आहे तर ती माझ्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि मला पालकमंत्री पद प्राप्त होईल. असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना आज केले आहे.