दिग्रस नगर परिषदेच्या तीन प्रभागांची निवडणूक अपीलमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता या तीन प्रभागांची निवडणूक शनिवारी दि. २० डिसेंबर रोजी होणार असून यासाठी आज गुरुवारी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत तीनही प्रभागांमधून एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रत्येक प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार असल्याने लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.