भंडारा: उद्या भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात दिवाळी मिलन सोहळा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित
दिवाळीच्या शुभ अवसरावर भारतीय जनता पक्ष, भंडारा जिल्हा तर्फे दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भंडारा येथील मंगलमूर्ती सभागृहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. दिवाळीच्या या मिलन सोहळ्यात जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.